Views
*सावित्रीबाई फुले माध्यमिक येथे पोलिस काका /पोलिस दिदी पथकाचे उदघाटन*

कळंब/प्रतिनिधी


उस्मानाबाद जिल्हयात नूतन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागात पोलिस काका/पोलिस दिदी कम्युनिटी पोलिसींग योजना अंमलात आणण्यासाठी ता. १८ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय कळंब येथे सदर कम्युनिटी योजना कार्यान्वित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात खालीलप्रमाणे उपविभागातील पोलिस ठाणे निहाय पोलिस काका/पोलिस दिदी पथक स्थापन करण्यात आले असुन मा. सहायक पोलिस अधिक्षक एम. रमेश भा.पो.से. यांचे मार्गदर्शनाखाली सदर पथकाचे नोडल अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक जी. पी. पुजरवाड हे पाहणार आहेत.

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय कळंब येथे मंगळवार ता.२१ रोजी पोलिस काका /पोलिस दिदी पथकाचे उदघाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास सहायक पोलिस अधिक्षक एम. रमेश भापोसे, पोउपनि जी.पी. पुजरवाड, शाळेचे मुख्याध्यापक कुपकर, पोलिस दिदी म्हणुन महीला पोलिस नाईक फुलसुंदर मॅडम, शाळेतील शिक्षकवर्ग, इतर कर्मचारी व शाळेतील विदयार्थी हे हजर होते. उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोउपनि जी.पी.पुजरवाड यांनी केले असुन पुढे सहाय्यक पोलिस अधिक्षक एम. रमेश शाळेतील विदयार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करतांना पोलिस काका /पोलिस दिदी या पथका चा उद्देश हा विदयाथ्यांना पोलिस स्टेशन ला न येता त्यांचे समस्याचे तात्काळ सोडवणुक व्हावी असे असल्याचे सांगुन विदयाथ्यांना थोडक्यात कायदेविषयक माहिती दिली. 

विदयार्थ्यांना कधीही अडचण असल्यास त्यांना संपर्क करण्याबाबत कळवून शाळेच्या आजुबाजूचे परिसरात विनाकारण फिरुन शाळेच्या विदयार्थ्यांना त्रास देणा-या टवाळखोर मुलांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगुन विदयाथ्र्यांना करीअर बाबत अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी कळंब येथील पोलिस दिदी व पोलिस काका यांचे नांव व संपर्क क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब मुंढे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अंमलदार किरण अंभोरे, अनिल मंदे , दीपक सुरवसे आदींनी सहकार्य केले.

 
Top