*विठ्ठलराव नारायण निरफळ यांचे निधन..*
कळंब (प्रतिनिधी)
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विठ्ठलराव नारायण निरफळ (वय ७५ वर्षे) यांचे दिर्घ आजाराने राहत्या घरी सकाळी १०.१५ वाजता निधन झाले आहे.
विठ्ठलराव निरफळ हे पत्रकार बालाजी निरफळ यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
कळंब येथील परळी रोड वरील स्मशान भुमी येथे अंत्यविधी करण्यात आला आहे. यावेळी शहरातील राजकीय मंडळी, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते.