Views


*25 हजार रूपयांची लाच घेताना तलाठी व कोतवाल यांना अटक*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील तलाठी युवराज नामदेव पवार (वय.36) व कोतवाल प्रभाकर रुपनर (वय.37) यांना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी (दि.23) रोजी रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदार यांच्या वडीलांनी 2005 साली घेतलेल्या शेत जमीनीचा फेरफार वरिष्ठांकडून मंजूर करून घेण्यासाठी यापूर्वी 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून सोमवारी (दि.25) रोजी सदर कामासाठी वरिष्ठांकडून फेर संदर्भ फार मंजूर करून घेण्यासाठी तलाठी युवराज पवार यांनी व कोतवाल प्रभाकर रुपनर यांनी तक्रारदार यांना 30 हजार रुपये लाच मागणी करुन तडजोडी अंती 25 हजार रुपये लाचेची रक्कम पवार यांनी पंचा समक्ष स्वीकारली.

    लाच लुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे, पोलिस अधिकारी इफ्तेकर शेख, शिधेश्वर  तावसकर, विष्णू बेळे, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
 
Top