Views
*मॅरेथनमध्ये हिंगणगाव येथील धावपातुंनी विविध गटात बाजी मारली आहे.*कळंब/प्रतिनिधी


उपविभागीय पोलिस कळंब च्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथनमध्ये तालुक्यातील हिंगणगाव येथील धावपातुंनी विविध गटात बाजी मारली आहे.

कळंब येथे उपविभागीय पोलिस कळंब च्या वतीने रुरल टॅलेंट हंट सात दिवसाच्या कालावधीत एक दिवस अडीच किलोमीटर ची मॅरेथॉन साठी ही दिला होता. या मध्ये शहराच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात धावपटू अगदी सकाळीच शहरात दाखल झाले होते. पाच विविध गटातून मॅरेथॉन एम.रमेश यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. 
यामध्ये सहा ते पंधरा वयोगटातील मुलींमध्ये रंजना सोमनाथ आवाड, द्वितीय स्वाती वाघमारे तर तृतीय देवयानी जाधव व प्रतिक्षा माळी यांनी पटकावले. याच वयोगट मध्ये मुले ज्ञानेश्वर शेप, आदित्य लोंढे, प्रकाश अभंग हे विजेते ठरले.
वयोगट पंधरा ते चाळीस मुलींमध्ये प्रथम योगिनी साळुंके (उस्मानाबाद) , द्वितीय अर्चना शेप ( लाडे वडगाव), तृतीय जयश्री राठोड (माजलगाव), मुलांमध्ये प्रथम उतरेश्वर घुगे (चींचपुर) ,द्वितीय उतरेश्र्वर साखरे (शिवानी), तृतीय गोपीनाथ गायकवाड (काचरवडी).
वयोगट ४० पेक्षा अधिक मध्ये प्रथम धर्मराज राऊत (कोथळा), द्वितीय सुरेश काकडे (कळंब), तर तृतीय विष्णू शेप (लाडे वडगाव) हे विजेते ठरले.
या सर्व विजेत्यांना सराफ व सुवर्णकार असोसिएशन क्या वतीने देण्यात आलेली पदके व रोख स्वरूपातील बक्षिसे उपस्थितांच्या हस्ते लागलीच देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, गजानन पुजरवाड , रामहरी चाटे यांच्यासह पोलीस कर्मचारी, नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
चौकट : 
वयोगटात बसत नसतानाही एक पाच वर्षाचा मुलगा प्रतीक सुरवसे याने ही मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल श्री रमेश यांनी त्याला कडेवर घेऊन त्याचाही बक्षीस देऊन सत्कार केला. 


उपविभागीय पोलिस कळंब च्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथनमध्ये विजय ठरलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना शय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, अमोल मालुसरे, गजानन पुजरवाड आदी शुभारंभ:-


 
Top