Views


*कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही समाजापासून नव्हे तर आपल्या घरापासून करायची असते - उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ*


कळंब/प्रतिनिधी

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही समाजापासून नव्हे तर आपल्या घरापासून करायची असते असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी केले, पिरामल फाउंडेशन आणि सत्यशोधक विचारमंच सेवाभावी संस्था कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतराष्ट्रीय महिला दिन शहीद भगतसिंग विद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंदिरा नगर भागातील व शहीद भगतसिंग शाळेतील शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.शैक्षणिक, सामाजिक व महिलांविषयक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार केला, त्यामध्ये शिक्षिका संगीता करपे (साखरे) व अनिता याटे, महिला बचत गट कार्यरत माने मॅडम, आणि सत्यशोधक संस्थेच्या मुलांच्या शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या सक्रीय कार्यकर्त्या वैष्णवी शिंदे, स्नेहा सिरसट, सुवर्णा सुरवसे, प्रतीक्षा खंडागळे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तर अध्यक्ष म्हणून रण सम्राट क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनोरमाताई शेळके, डॉ.मीनाक्षी शिंदे (भवर) ह्या होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, लेखणी व पुष्पगुचछ देऊन सत्कार करण्यात आला.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार मंगेश यादव अहिल्या गाठाळ यांना लेखणी देऊन सत्कार केला.

यावेळी श्रीमती गाठाळ पुढे म्हणाल्या की, आपल्या घरातील मुलां-मुलींना समानतेची वागणूक देऊन त्यांना आत्मनिर्भर, आत्मनिर्णय व समान अधिकार द्यावेत, त्यांना सक्षम करून समाजात वावरू द्यावे हे प्रत्येक पालकाच्या मनात रुजने काळाची गरज आहे.

प्रा.डॉ.मिनाक्षी शिंदे यांनी स्त्रीविषयक कलीयुगातील वास्तव मांडणी करून प्रत्येक दिवशी स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे केला. मनोगत व्यक्त करताना हा आशावाद व्यक्त करीत, कार्यक्रमाला विशेष बहर आणला.

उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत पिरामल फाऊंडेशनचे फेलो अक्षय शिनगारे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे प्रास्ताविक मांडून,आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाचा परिचय दिला. मनोरमा शेळके यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श सिरसट यांनी केले. शहीद भगतसिंग विद्यालयाचे शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top