Views

*कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहीत केलेल्याशासकीय वसतीगृहांच्या इमारत परतीचे आदेश*

   उस्मानाबाद/ प्रतिनिधी


जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि विषाणुचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि पूर्वतयारी योजना आखण्याच्या अनुषंगाने तसेच कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी अधिग्रहन करण्यात आलेल्या शासकीय वसतीगृहाच्या इमारती परत करण्याबद्दल सहायक आयुक्त यांच्या सूचनेवरुन परत करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी आज दिले आहेत.
             जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर दि.07 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर दि.07 फेब्रुवारी 2022 पासून नियमित सुरु राहतील.
            मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच निवासी शाळा आणि शासकीय वसतीगृहे सुरु करणे आवश्यक असल्याने अधिग्रहीत केलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील इंदिरा नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे शासकीय वसतीगृह, आकाशवाणी केंद्रासमोरील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (जुने), वैराग रोडकडील अनु.जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, तुळजापूर तालुक्यातील मागासवर्गीय तथा आर्थिक मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, नळदुर्ग येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, उमरगा तालुक्यातील मुरुम येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, लोहारा तालुक्यातील हिप्परगा रोड, ग्रामीण रुग्णालयाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, भूम तालुक्यातील गोलेगाव येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, परंडा तालुक्यातील परंडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह या अधिग्रहीत वसतीगृच्या इमारती परत देण्यात आल्या आहेत. 


 
Top