Views



*तेरणा काठची पोरं  वेबसीरीजच्या ५० व्या भागाचे विमोचन*




उस्मानाबाद/प्रतिनिधी

 तालुक्यातील दहिफळ येथील
तेरणा काठची पोरं मराठी वेबसीरीजच्या ५० व्या भागाचे विमोचन जेष्ठ नाट्य कलाकार प्रभाकर ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
गावातील कलाकार यांनी मिळुन या वेबसीरीजची निर्मिती केली.येथील रहिवासी योगराज पांचाळ हे निर्माता दिग्दर्शक असुन आता पर्यंत वेबसीरीजच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयांवर भाग प्रसारीत केले आहेत.सण उत्सव, वास्तव विषय ही हाताळले आहेत.अखंड तब्बल ५० भाग पुर्ण झाले असून मोबाईलवर शुटींग केली आहे.झीरो बजेट ही वेबसीरीज एका वर्षात पदार्पण करत आहे.कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना गावातील कलाकार घेऊन ५० भाग पुर्ण करण्यासाठी योगराज पांचाळ यशस्वी झाले आहेत.

ग्रामीण भागात अनेक होतकरू कलाकार असतात,त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे.सध्या मोबाईल इंटरनेटचा काळ आहे या माध्यमातून बरेच कलाकार प्रसिध्दी झोतात आले आहेत.परंतू त्यांच्या कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे.तरच ती कला बहरत जाईल.

कुठलेही तांत्रिक शिक्षण नसताना मोबाईलवर शुटींग करून तब्बल ५०भाग पुर्ण केले आहेत.५० भागाचे विमोचन जेष्ठ नाट्य कलाकार प्रभाकर ढवळे यांच्या हस्ते केक कापून मोबाईलवर लिंक ओपन करून विमोचन केले.
यावेळी वेबसिरीजचे निर्माता दिग्दर्शक योगराज पांचाळ ,वसंत मते, फुलचंद काकडे, देवीदास भातलवंडे, प्रशांत भातलवंडे,कृष्णा पाटील बालकलाकार सोहम ढवळे, आदित्य कुटे प्रताप खंडागळे उपस्थित होते
 
Top