Views

 
*जि.प.मध्ये प्रजासत्ताक दिनी अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहन*



      
उस्मानाबाद/प्रतिनिधी

 प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त दि.26 जानेवारी-2022 रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहनाचा समारंभ सकाळी ठिक 8.15 वाजता जिल्हा परिषद मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
       भारताची राज्यघटना दि.26 नोव्हेंबर-1949 रोजी स्वीकारण्यात आली आणि संविधान दि.26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले.त्यामुळे दि.26 जानेवारी 2020 पासून दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहन कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरमाना) यांचे सामुहिक वाचन करण्यात यावे, असे कळविण्यात आले आहे.
     तेव्हा बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रध्वजारोहन समारंभापूर्वी ठीक 08.00 वाजता भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरमाना),चे सामुहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता,केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टनसिंग बाबत वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करत,गर्दी टाळून आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल,कार्यक्रम वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे,असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी कळविले आहे.
                                          
 
Top