Views

अब.. ब ब शेतकऱ्याच्या सातबा-या वर 40 कोटी पेक्षाही जास्त दंड !!

कळंब/प्रतिनिधी


ऐकावं ते नवलंच! असं म्हटलं जातं...मस्सा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांला मात्र ऐकावं तेच काय, पहावं ते ही नवलंच! असा भयंकर अनुभव आला असून कोणत्याही गौण खणिजाचे उत्खनन न केलेल्या व शेती पिकाखाली असलेल्या आपल्या वहीत जमिनीच्या सातबारावर चक्क चाळीस कोटी रूपयांच्या दंडाचा बोजा पडला आहे. या न केलेल्या गुन्ह्यापोटी दफ्तरी लागलेल्या या दंडाच्या कोट्यावधीच्या आकड्याने शेतकर्‍यांची मात्र झोप ऊडाली आहे. 


कळंब बार्शी हा राज्यमार्ग शेगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गात संलग्न झाल्यानंतर, त्याचे मागच्या चार वर्षांपूर्वी काम सुरू झाले. कायम प्रगतीपथावर असलेल्या या कामाचा मस्सा ख येथे कॅम्प आहे. याठिकाणी त्यांचा क्रशींग, मिक्सिंग प्लॅन्ट, कार्यालय आहे. याच कामासाठी मस्सा येथील काही जमिनीत गौण खणिजाचे खोदकाम करण्यात आले आहे. 

यात रस्ता कामासाठी केलेले प्रत्यक्षातील खोदकाम, त्यापोटी शासनखाती भरणा केलेली रक्कम यात काही तफावत असल्याचे समजते. याच अनुषंगाने भुमि अभिलेख विभागाने याची तपासणी ही केली होती. यानंतर संबंधित कंपनीच्या कामावर अधीकचे खोदकाम झाल्याचा प्रकार समोर आल्याने महसूल विभागाने संबंधिताना दंडात्मक रक्कम आकारणी करून ती भरणा करावी असे सुचीत केले होते. 

यानुसार रक्कम भरणा न केल्याने खोदकाम केलेल्या काही सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीवर दंडाच्या रक्कमेचा बोजा चढवावा असे पत्र तलाठी कार्यालयास देण्यात आले होते. यानुसार मस्सा ख. येथील तलाठी कार्यालयाने असा फेरफार केला व त्यास मस्सा येथील मंडळ अधिकारी यांनी मंजुरीही दिली आहे. 
    

मात्र, या प्रक्रियेत येथील शेतकरी ज्योतीराम जनार्धन वरपे यांच्या गट नंबर ७१९ मधील एक हेक्टर १३ गुंठे जमीनीच्या सातबारावर अचानक कंत्राटदार मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला ठोठावण्यात आलेल्या दंडात्मक रक्कमेचा तब्बल ४० कोटी रूपयाचा बोजा चढवण्यात आला असल्याची तक्रार जोतीराम जनार्धन वरपे यांचा रणजीत वरपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

चौकट...
११३ गुंठे जमिन, चाळीस कोटींचा बोजा

जोतीराम जनार्धन वरपे यांना सर्व्ह क्रमांक ७१९ मध्ये एक हेक्टर १३ एवढी जमीन आहे. एकूणच ११३ गुंठे जमिन असलेल्या या क्षेत्राच्या सातबारावरील 'इतर' अधिकारात चाळीस कोटींच्या दंडाचा आकडा बोजा म्हणून चढवण्यात आला आहे. 


खोदकाम तर सोडा , साधा ओरखडासुद्धा नाही हो

दरम्यान, रणजीत वरपे यांनी यासंदर्भात चुकीच्या माहितीच्या आधारे वडिलांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर कोट्यावधीचा बोजा चढवला आहे. माझ्या जमिनीत खोदकाम तर सोडा साधे ओरखडे ही नाहीत. उभ्या पिकाखालील, वहित जमिन आहे. यामुळे आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे .
 
Top