Views
  *सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारीस कार्यक्रम*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा कार्यक्रम दि.23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता,केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टनसिंग बाबत वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करत,गदी टाळून आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल,कार्यक्रम वेळेवर मास्कसह उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात आले आहे,असे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे. 
                                 

 
Top