Views


*शासकीय वसतीगृहातील रिक्त जागांवर*
*प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

  
उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृहाकरिता शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षाकरिता रिक्त असलेल्या जागेवर शालेय विद्यार्थी इयत्ता दहावी,अकरावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून),बी.ए.,बी.कॉम,बी.एस.सी.अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेल्या पदविका,पदवी आणि एम.ए.,एम.कॉम.,एम.एस.सी.असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदविका इत्यादी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून),अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठी अर्ज शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांच्याकडे उपलब्ध आहेत.या प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरुन संबंधित वसतीगृहाचे गृहपाल यांच्याकडे दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची दि.31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे. 
                     
 
Top