*सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सला आ.बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
अहमदपूरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी आज (दि.13) सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स अॅन्ड पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटला सदिच्छा भेट दिली. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची पाहणी करून उस्मानाबादसारख्या शहरात अत्याधुनिक आरोग्य सेवासुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.दापके-देशमुख यांच्यासह व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले. आमदार (अहमदपूर-चाकुर) श्री.बाबासाहेब पाटील हे उस्मानाबाद येथे कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांचे स्नेही असलेले डॉ.दिग्गज दापके- देशमुख यांच्या सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सला सदिच्छा भेट दिली. यावेळी सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, सह्याद्री ब्लड बँक, सह्याद्री इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल, सह्याद्री फाऊंडेशन्स, उस्मानाबाद चाइल्ड-लाइन आदीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य व सामाजिक उपक्रमांबाबत त्यांनी माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांनी शाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य नितीन बागल, प्राचार्य डॉ. रमेश दापके-देशमुख, हर्षद दापके - देशमुख प्रा.पी.एन. दापके, अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला आदी उपस्थित होते.