Views*राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन*

  उस्मानाबाद/प्रतिनिधी

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. मतदारांना विशेषत नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे हा उद्देश आहे.देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविणे आहे .त्यासाठी मतदारांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते. हा दिन जिल्हाभरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले . 
राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत श्री.दिवेगावकर बोलत होते .या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी दि.10 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली . याबाबत निवडणूक आयोगाने दि.21 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रात केलेल्या सूचनानुसार शिक्षणधिकारी माध्यमिक यांनी जिल्हयातील 10 मोठया शाळांमध्ये निबंध,लघुपट,वक्तृत्व, चित्रकला,घोषवाक्य या अनुषंगाने स्पर्धा घ्यावयाच्या आहेत .त्याचे फोटो व अहवाल Dydeoosmanabad@gmail.com या ई-मेल वर आणि निवडक निबंध,चित्रकला,घोषवाक्य तसेच फोटोच्या प्रती निवडणूक विभागास सादर करावेत.तसेच स्पर्धतील पुरस्कार प्राप्त प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची नावे दि.20 जानेवारी 2022 पर्यंत निवडणूक विभागास उपलब्ध करून दयावीत. जिल्हास्तरावर 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस उस्मानाबाद शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सकाळी 11.वाजता साजरा करण्याचे संपूर्ण नियोजन करावे. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी स्वत: उपस्थित राहणार असल्यामुळे शिक्षण अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष दयावे.नदीम शेख क्रिडा अधिकारी उस्मानाबाद यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी दि.25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अर्जून पुरस्कार विजेत्या सारिका काळे,क्रिडा अधिकारी व आशियाई चषक स्पर्धसाठी निवड झालेला श्री. राजवर्धन हंगरगेकर यांना सदरील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात यावे.कृषी महाविद्यालय,किणी,उस्मानाबाद यांना आपल्या महाविद्यालयात मतदान कार्ड आधार कार्डाशी लिंक करणे या विषयांच्या अनुषंगाने वाद-विवाद स्पर्धा आयोजित कराव्यात तसेच वृक्तत्व व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करून सदरील कार्यक्रमाचे फोटो Dydeoosmanabad@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावे.आकाशवाणी उस्मानाबाद यांनी दि.20 जानेवारी 2022 ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद उस्मानाबाद,उपजिल्हा निवडणूक अधिकारी,उप विभागीय अधिकारी उस्मानाबाद यांची बाईट घेऊन या कालावधीत रोज दि.25 जानेवारी 2022 राष्ट्रीय मतदार दिवसांची माहिती प्रसारित करावी तसेच दि.25 जानेवारी 2022 रोजी रामकृष्ण महाविद्यालय,उस्मानाबाद या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाची माहिती प्रसारित करावी.आकाशवाणी उस्मानाबाद यांनी 25 जानेवारी 2022 रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमानिमित्त श्री. निपाणीकर व एक स्त्री सयोजिका यांचा निवडणूक विभागाशी समन्वय साधून देण्यात यावा.मुख्याधिकारी नगर परिषद, उस्मानाबाद यांनी निवडणूक विभागाशी राष्ट्रीय मतदार दिनाचे छपाईचे नमुने प्राप्त करून जिल्हयातील 5 सार्वजनिक ठिकाणी लावून Dydeoosmanabad@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावेत.जिल्हा माहिती अधिकारी यांना सर्व वरील समिती मधील यांचेशी समन्वय साधून उपक्रमांची व्यापक प्रसिध्दी दयावी.विविध कार्यक्रमाची व बातम्याची कात्रणे Dydeoosmanabad@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावी. व कात्रणाची संचिका दि.27 जानेवारी 2022 रोजी निवडणूक विभागास सादर करावे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी उस्मानाबाद यांनी जिल्हयातील मोठया माध्यमिक शाळामध्ये चित्रकला आयोजित करून सदर कार्यक्रमाची व चित्र कलाची फोटो Dydeoosmanabad@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावेत तसेच स्पर्धतील प्रथम,व्दितीय,तृतीय,क्रमांकांच्या विद्यार्थ्यांचे नावे दि.20 जानेवारी 2022 पर्यंत निवडणूक विभागास उपलब्ध करून दयावीत.कोविड-19 महामारीच्या संदर्भात केंद्र व राज्य कडून निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संदर्भाधीन पत्रातील आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात यावा.
  यावेळी बैठकीस निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार चेतन पाटील,कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किरण थोरात,प्राचार्य डॉ.जे.ई.जहागीरदार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.पवार,माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी काझी टी.एफ, आकाशवाणी केंद्र प्रसारण अधिकारी कृष्णा शिंदे, क्रिडा अधिकारी नदीम शेख आणि निवडणूक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 
Top