Views
*आ. राणाजगजितसिंह पाटीलसाहेब यांच्या संकल्पनेतून बुथ तेथे उद्योजक निर्माण करण्यासाठी उद्योजकांचा मेळावा संपन्न..*
    

कळंब/प्रतिनिधी


आ. राणाजगजितसिंह पाटीलसाहेब यांच्या संकल्पनेतून व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी व जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रत्येक बुथ वर एक उद्योग हा कार्यक्रम डिकसळ एम आय डी सी येथे संपन्न झाला. 
  तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांना उद्योग विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अगोदर सक्षम व्हावे आत्मनिर्भर होऊन इतरांना मदत करून याविषयी माहिती भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे श्री. शुशांत भुमकर यांनी दिली. तसेच विविध योजनांची माहिती प्रा. किरण आवटे सर व जिल्हा उद्योग निरिक्षक चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन करून दिली..
  यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे,दत्ताभाऊ कुलकर्णी ,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील,तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे,युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार,बजरंग आप्पा शिंदे,अरुण चौधरी,सुरेश कोरे, संदीप बाविकर,खंडेराव मैंदाड,संतोष कस्पटे,मिनाज शेख, नागजी घुले,संजय जाधवर,शिवाजी गिड्डे,अमोल माकोडे,सोमनाथ टिंगरे,बालाजी मडके, महिला आघाडी तालुकाध्यक्ष कविता जगताप, परविन रहीम पठाण,गीतांजली शरद घोडके,ज्योशाला रवींद्र वायसे व तालुक्यातील पदाधिकारी, शक्ती प्रमुख,बुथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
 
Top