Views

*न्यासाच्या विश्वस्त बदलाबाबत*
*कार्यवाहीसाठी विशेष मोहिम*
*अवादातीत प्रकरणे सादर करण्याचे आवाहन*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी  

    
 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 अन्वये कार्यकारीणीची विहित कालवधी पूर्ण झाल्यावर अथवा इतर काही कारणांमुळे न्यासाच्या विश्वस्तांमध्ये बदल झाल्यास न्यासाचे विश्वस्तांमार्फत सहाय्यक धर्मादय आयुक्त यांच्या न्यायालयात बदल अर्ज सादर केले जातात. तथापि,या बदल अर्जांबाबत विश्वस्ताकडून आवश्यक आणि विहित कागदपत्रांची पुर्तता न होणे, न्यायिक प्रकरणात विश्वस्तांनी हजर राहून आवश्यक ती कार्यवाही न करणे इ. बाबींमुळे हे बदल अर्ज प्रलंबीत राहतात. यासाठी येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात 13 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.याचा संबंधितांनी लाभ घ्यावा,असे आवाहन येथील सहाकयक धर्मादाय आयुक्त एस.पी.पाईकराव यांनी केले आहे.
       न्यासास भविष्यात कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून राज्याचे मुंबई येथील धर्मादाय आयुक्त यांनी राज्यातील सर्व अवादातीत न्यासांचे विश्वस्त बदलासंदर्भातील (वाद नसलेले) प्रकरणे दि.13 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबवून जलद गतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. 
        उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत कार्यरत अवादातीत (वाद नसलेल्या) न्यासांचे विश्वस्तांनी दि. दि.13 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत त्यांनी दाखल केलेल्या बदल अर्जांसंदर्भात हजर राहून त्यांनी दाखल केलेले अवादातीत बदल अर्जांसंदर्भातील पुर्तता करण्याचे न्यासांच्या विश्वस्तांना आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top