Views


*विविध गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार आरोपी शिराढोण पोलिसांच्या ताब्यात*


उस्मानाबाद/प्रतिनिधी


उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील आरोपी कळंब तालुक्यातील शिराढोण पोलिसांनी ताब्यात घेतले
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील 06 डिसेंबर रोजी 
सोयाबीन चोरीस गेले होते. याची शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने शिराढोण पोलिसांनी तपास चक्र फिरवत गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमी वरून आरोपी रमेश उध्दव चव्हाण यांनी चोरी केल्याची माहिती शिराढोण पोलिसांना मिळाली होती.

 सदर आरोपी हा उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील पारधी पीडी येथे असल्याची खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली. 10 डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक निवा जैन व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश व शिराढोण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव नेटके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून ढोकी पोलिस ठाण्याचे एक पथक सोबत घेत आरोपीस पळसप येथील पारधी पीडी वरून ताब्यात घेतले.

 आरोपीस पोलिसांनी खाक्या दखवताच आरोपी ने शिराढोण व जिल्ह्यात अनेक चोरी केल्याची कबुली दिली.आरोपी हा जिल्ह्यातील विविध 15 गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता चौकशी मध्ये समोर आले सदर गुन्हाचा तपास शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव नेटके करत आहेत.
 
Top