*निवडणूक आचार संहितेमुळे*
*अंगणवाडी सेविका भरती जाहिरात रद्द*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजनाच्या तेर येथील ग्रामीण प्रकल्प अंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस पद भरतीसाठी महिला व बाला विकास विभागाच्याशासन निर्णयानुसार दि.13 ऑगस्ट 2014 मधील निकष,अर्टी,शर्ती,गुणदान पध्दतीनेचे अधिन राहून अंगणवाडी सेविका,मदतनीस मानधनी पदासाठी जाहीर प्रकटन देण्यात आले आहे.
तथापि,जाहिर प्रकटनमधील माहितीनुसार कोंड,रुई ढोकी आणि बुकनवाडी या गावात आदर्श निवडणूक आचारसंहिता ( Model Code of Conduct ) लागू असल्यामुळे कोंड,रुई ढोकी आणि बुकनवाडी येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरतीसाठी या जाहिर प्रकटन,जाहिरात रद्द करण्यात येत आहे,असे बाल विकास प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प यांनी कळविले आहे.