*तरूणाकडून पिस्तूल मॅगजीनसह 4 जिवंत काडतुसे जप्त*
कळंब/ प्रतिनिधी
शहरामध्ये एका तरुणाकडे पिस्तुल आढळून आल्याने शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. तरुणाकडून पिस्तूलसह मॅगजीन आणि 4 जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी (05) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शहरालगत असलेले विश्वजीत हॉटेलमध्ये एक अज्ञात तरुण पिस्तूल घेऊन बसलेला असल्याची माहिती मिळाली. याची गंभीरतेने दखल घेत कळंब उपविभागीय अधिकारी एम रमेश यांनी पोलिस उपनिरीक्षक मालुसरे, पोलिस काॅन्स्टेबल विक्रम पतंगे, सय्यद, सादिक शेख,काटवटे, यांना सोबत घेऊन हॉटेलमध्ये छापा मारून तरुणाला ताब्यात घेतले.
माहिती मिळाल्याने पोलिसांनी हॉटेल विश्वजीत कडे धाव घेतली तेथे संशयित राहुल दिलीप गायकवाड या तरुणाला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल मॅगजीनसह 4 जिवंत काडतुसे जप्त केले. त्यांच्याकडील आधार कार्डावरून तो औरंगाबाद येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तरूणांवर पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पतंगे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 अन्वये कलम 3 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चाटे करीत आहेत.
संबंधीत तरुण हा औरंगाबाद येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर त्याच्याकडून विना नंबर प्लेटची दुचाकी मोबाईल कसा 92 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संबंधित तरूण कोणत्या कारणासाठी तो पिस्तुल बाळगून होता? मध्ये कशासाठी आला? कळंब मध्ये कोणा सोबत त्याचे धागेदोरे? या संबंधात अधिक माहिती अधिक तपास पोलिस करीत आहे आरोपीला कळंब न्यायालयात हजर करून अधिक तपास करण्यासाठी त्याला पोलिस कस्टडी मागण्यात येणार असल्याची माहितीपोलिसाकडून मिळाली