Views


*पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन संपन्न!*

प्रतिनिधी/इकबाल मुल्ला

 
पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणां विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते. न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते. तसेच धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करण्याच्या विरोधात बंधुतेच्या मूल्यांचे हनन होवू नये म्हणून "पैंगंबर मोहम्मद बिल" गेल्या अधिवेशनात वंचित बहुजन आघाडी तर्फे विधानपरिषद सदस्य आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आले. मात्र शासनाने अजून या संबंधी काहीच कृती केली नाहीय. शासनाच्या याच वृत्तीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5 जुलै 2021 रोजी विधान भवनावर मोर्चा काढुन उपरोक्त मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पहोचवण्यात आले होते तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून जनजागृती अभियान चालवण्यात आले तरी ही शासनातील तिन्ही पक्ष या मागणीकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडी मुस्लिम प्रश्नांबाबत गंभीर असुन सोमवार 22 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणां विरोधात *आज दिनांक 22/11/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद येथे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.*
*आंदोलनातील मागण्या -*
1. धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे 'पैगंबर मोहम्मद बिल' वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
2. न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
3. महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
4. संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
5. वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
6. सारथी- बार्टी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.
या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आले यावेळी निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष बी.डी शिंदे, महिला जिल्हा अध्यक्ष एडवोकेट जिनत प्रधान, मराठवाडा कार्यकारणी सदस्य भैय्यासाहेब नागटिळे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, युवक जिल्हाध्यक्ष दिलीप आडे, प्रवक्ते एडवोकेट के टी गायकवाड, उपाध्यक्ष सुशील बनसोडे, महिला उपाध्यक्ष ज्योती लोखंडे, संघटक अनुराधा लोखंडे, सचिव सुजाता बनसोडे , सदस्य विद्याताई वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब आणदुरकर, जिल्हा प्रवक्ते माजी.विकास बनसोडे, कार्यकर्ते मिलिंद पायाळ, परंडा तालुका महासचिव दयानंद बनसोडे, सोलापूर राहुल गायकवाड सर, एस.वि.कांबळे, संदिपान कांबळे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top