Views


*भाजपा उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक विषय घेऊन धरणे आंदोलन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर दि.22 नोव्हेंबर रोजी विविध विषय घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यसरकार च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. आणि जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांचे महावितरण काढून सक्तीने होत असलेल्या वीज तोडणीच्या विरोधात, पिक विमा न देता शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या वसुली सरकारच्या विरोधात पेट्रोल व डिझेल मधील करामध्ये कपात न करता वसुली करणाऱ्या सरकारच्या विरोधात यामध्ये प्रामुख्याने नांदेड मालेगाव अमरावती येथे झालेल्या घटनेच्या विरोधात हे प्रमुख विषय आणि यासह अनेक विषयांवर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा बुध्दीजीवी प्रकोष्टचे संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, नेताजी पाटील यांनी आंदोलनाबद्दल मत विषद केले. तसेच समारोप प्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणले की, गेल्या दोन महिन्यापासुन शेतकरी ओल्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे, सोयाबीनसह अन्य पिकांचे 70 ते 80 टक्के नुकसान राज्य सरकारने जाहीर केले परंतू त्यांनी हेक्टरी 10000/- इतकीच मदत जाहिर केली आणि त्यातही अर्धवट म्हणजे टक्केवारी नुसार ६६ टक्के म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 2000 ते 4000 पर्यंतच रक्कम देऊ केली. सरकारने शेतकऱ्यांना वेठीस न धरता तसेच अगोदरच संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांचे विजबिलासाठी महावितरण तोडण्यात आले. आता शेतकरी हा हवालदिल असल्यामुळे महावितरण आघाडी सरकार विरोधात दोष व्यक्त करण्यासाठी भाजपाच्या धरणे आंदोलनात सहभागी आहे. तसेच त्रिपुरा येथे न घडलेल्या प्रसंगाचा बाऊ करुन महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव व नांदेड येथे घडवलेल्या दंगलीची निवृत्त न्यायाधिश यांच्याकडुन चौकशी करुन, खोटया आरोपाखाली भाजपा कार्यकत्यावर दाखल केलेले गुन्हे वापस घ्यावे, असेही नितीन काळे यांनी सांगीतले. या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा समनव्यक नेताजी पाटील, प्र‌.का.सदस्य ऍड.खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस ऍड.नितीन भोसले, प्रदीप शिंदे, इंद्रजीत देवकते, दत्ता सोनटक्के, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, रामदास कोळगे, विनायक कुलकर्णी, विजय शिंगाडे, प्रवीण सिरसाठे, महेश चांदणे, राहुल काकडे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, मीनाताई सोमाजी, कविता जगताप, विद्या माने, देवकण्या गाडे, पूजा राठोड, गुलचंद व्यवहारे, दत्तात्रय देशमुख, सुशांत भूमकर, पांडुरंग लाटे, अभय इंगळे, दाजीप्पा पवार, शिवाजी पंगूडवले, प्रवीण पाठक, ओम नाईकवाडी, मनोज रनखांब, पांडुरंग पवार, लिंबराज साळुंके, मोहन खापरे, संतोष क्षीरसागर, संघु स्वामी, निळकंठ पाटील, राहुल शिंदे, हिम्मत भोसले, विजय सरडे, गजानन नलावडे, सुजित साळुंके, विनोद निंबाळकर, सूरज शेरकर, प्रसाद मुंडे, सागर दंडणाईक, अर्जुन पवार, यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील जिल्हा पदाधिकारी, विविध आघाडी मोर्चा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जि‌.प.सदस्य, पं.स. सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top