*योजनांच्या महामेळाव्यात भूजल सर्वेक्षणाच्या*
*प्रात्याक्षिकांचे मान्यवरांकडून कौतूक*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याकरिता शासकीय योजनांचा महामेळावा 11 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.यात भूजल सर्वेक्षणाच्या प्रात्यक्षिकांचे मान्यवरांकडून कौतूक करण्यात आली.
या मेळाव्यामध्ये पाऊस पाणी संकलनाद्वारे भूजल पुनर्भरण,छतावरील पाऊस पाणी संकलन,विहिर कुपननलिका,पुनर्भरण, जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रात्याक्षिकांचे प्रदर्शन करण्यात आले. या विविध उपयोजनाबाबत माहिती देण्यात आली.या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर,पोलीस अधीक्षक नीवा जैन पोलीस,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय पाटील,जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव वसंत यादव,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाचे कार्यालय प्रमुख एस.बी.गायकवाड,वरिष्ठ भूवैज्ञानिक,सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ.मेघा शिंदे,कनिष्ठ भूवैज्ञानिक श्रीमती मनिषा डोंगरे आणि श्रीमती शुभांगी गुर्वे यांची उपस्थिती होती.या शिबिरात अटल भूजल योजना,भूजल साक्षरता अभियानांतर्गत प्रदर्शित करण्यात आलेली माहितीची व या उपक्रमाची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात आली.