Views


*जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव ऑनलाईन आणि ऑफलाईन*

*पद्धतीने 25 नोव्हेंबर पर्यंत स्वीकरणार*

 

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 जात पडताळणीसाठी दि.16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु आहेत. त्याकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची, जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने तसेच अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑनलाईन आणि ऑॅफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्याची माहिती संबधित विभागाने कळवली आहे.

दि.17 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. तसेच ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन फॉर्म नंबर 16 barti.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जदारांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत जेणेकरुन विहित कालावधीत उमेदवारांचे जात वैधता प्रकरणी कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव तथा संशोधन अधिकारी एस.टी.नाईकवाडी यांनी केले आहे.
 
Top