Views


*केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिला आहे तरी राज्य सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत -- लोहारा तालुका भाजपाची मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 
केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, या मागणीसाठी लोहारा तालुका भाजपाच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.12 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि, अजूनही आपल्या सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपाशासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही, याची नोंद घ्यावी. राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात. आमची मागणी आहे की, आपल्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी. तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी. व तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलगिकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एस.टी. कामगार व कर्मचाऱ्यांने सुरु केलेल्या संपास लोहारा तालुका भाजपाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात येत आहे. यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी नगरसेवक आयुब शेख, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, एस.सी तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, ओबीसी जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, भोजप्पा कारभारी, व्यापारी सरचिटणीस बाळु माशाळकर, नागनाथ लोहार, युवराज जाधव, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
 
Top