Views


*धारासूरमर्दिनी मंदिरात होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


शहरातील धारासूरमर्दिनी मंदिरात आज महानवमीदिवशी (दि.14) होमकुंडावर धार्मिक विधीनंतर घटोत्थापन करण्यात आले. ‘आई राजा उदेऽ उदेऽऽ’च्या जयघोषात लोकरेकुटुंबीयांच्या वतीने कोहळ्याची आहुती देण्यात आली. यावेळी देवीभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
धारासूरमर्दिनी मंदिरात नवरात्र उत्सव कालावधीत मंदिर समितीचे अध्यक्ष रावसाहेब डोके यांच्या मार्गदर्शनाखाली घटस्थापनेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज महानवमीदिवशी होमकुंडावर धार्मिक विधी करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत लोकरे व लोकरे कुटुंबीयांच्या वतीने होमात कोहळ्याची आहुती देण्यात आली. धार्मिक विधीनंतर मंदिरातील घटोत्थापन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी तसेच महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी विजयादशमीदिनी देवीचा सीमोल्लंघन सोहळा होत आहे. यानिमित्ताने दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना शिस्तबद्धपणे दर्शन घेता यावे याकरिता मंदिर समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
 
Top