Views
*ओबीसी जनमोर्चा शहराध्यक्षपदी नरसिंह मेटकरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 
ओबीसी जनमोर्चाची बैठक मंगळवार दि.५ ऑक्टोबर रोजी प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. खंडेराव चौरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन उस्मानाबाद शहराध्यक्षपदी नरसिंह लक्ष्मण मेटकरी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांनी दिली आहे. याबैठकीत ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रीय संघठना काम करणार असल्याचे सागण्यात आले. बैठकीस ओबीसी जनमोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर दत्ताभाऊ सोनटक्के, पिराजी मंजुळे यांची नियुक्ती करण्यात आली. याबैठकीस मराठवाड्याचे संघठक लक्ष्मण माने, युवकचे जिल्हाध्यक्ष सतिश कदम, पांडूरंग लाटे आदी उपस्थित होते. बैठकीत निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
 
Top