Views
*जळकोट ता.तुळजापुर येथील तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात 675 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्लाडॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन मंगळवार दि.5 ऑक्टोबर रोजी, मौजे जळकोट ता.तुळजापुर येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा नांदुरी व परिसरातील सर्व वयोगटातील 675 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. या शिबीराचे उद्दघाटन जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, कार्यक्रम अध्यक्ष रेणुकाताई इंगोले (पं.स.सभापती), व्यंकट बेगडे, मा.जि.प.सदस्य गणेश सोनटक्के, माजी सरपंच संजय माने, भिवा इंगोले, ॲड. आशीष सोनटक्के, अक्षय जोखंडे, रोहीत कदम, सतिष पिसे (पत्रकार), इराण्णा सोन्ने, आप्पु कितजे, बालासाहेब पाटील, आपु बंडगर, कलीम जमादार, खासीम जमादार, प्रविण जाधव, सतिष माळी, प्रशांत फिजले व ग्रा.प. कर्मचारी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.परवीन सय्यद, डॉ. रोहीत दामोदर, डॉ.अपूर्व दूबे, डॉ.आदर्श यादव, डॉ.रोहीत कोळी, डॉ.निमेश पाटीदार, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, अबुल हसन रजवी, विनोद ओहळ, रवी शिंदे, पवन वाघमारे, संदीप चव्हाण, विठ्ठल शिंदे, आशा कार्यकर्त्या मनिषा गायकवाड, रेणुका मळगे, शालीनी कडते, वलमाला मुखगे, जयश्री कामशेट्टी, जयश्री सातलगावकर, ललिता कोळी, लक्ष्मी कोरे, सुरेखा बिराजदार, ईत्यादींदी परीश्रम घेतले.
 
Top