Views






*पंचायत समिती लोहारा येथे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली
आढावा बैठक संपन्न*



उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 पंचायत समिती लोहारा येथे उस्मानाबाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदरील आढावा बैठकीमध्ये पंचायत विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ग्राम पंचायत विभाग, घरकुल विभाग, कृषी विभाग, रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बांधकाम, एकात्मिक बाल विकास विभाग, जलजीवन मिशन, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग अशा विविध विभागाचा आढावा घेऊन काम कमी असलेल्या ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक व संबधित विभाग प्रमुख यांना प्रलंबित कामे पूर्ण करून घेणे विषयी व कामात कमी असलेल्या ग्राम पंचायतती व संबधित विभागांना माहे मोव्हेबर अखेर कामात प्रगती करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सुचना दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा व स्वछता अंनतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत नितीन दाताळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुजारी, जिल्हा कृषी अधिकारी पठाडे, जलसंधारण अधिकारी, गट विकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ.अमित कदम, कार्यकारी अभियंता, बाल विकास अधिकारी, श्री कांबळे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कठारे, गट शिक्षण अधिकारी श्रीमती तबसुम सयदा, यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीचे बैठकीचे सूत्रसंचालन श्रीनिंवास पाटील यांनी केले. 
----------------------------------------------------------------------
 प्रधान मंत्री आवास योजना - ग्रामीण महा आवास योजना अंतर्गत डेमो हाउस चे उद्घाटन सदर बैठकीच्या अनुषगाने पंचायत समितीच्या आवारात उभारलेल्या घरकुल डेमो हाउस चे उद्घाटन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात कमी खर्चात चांगले घर कसे बांधता यावे, याचा नमुना म्हणून सदर डेमो हाउस बांधण्यात आला आहे.
 
Top