Views

*श्री.स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर येथे शिक्षण महर्षी श्री.सुभाष (दादा) कोळगे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संचलित, श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर येथे शिक्षण महर्षी श्री. सुभाष (दादा) कोळगे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 09 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 यावेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सद्यस्थितीत आपल्या जिल्हयामध्ये रक्तपेढीत रक्ताची प्रचंड कमतरता आहे. तर गंभीर आजार असलेल्या रूग्णाचे प्राण वाचतील त्यामुळे तरुण विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व अन्य सर्वांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आवाहन महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top