Views


*माजी मंत्री आ.संभाजीराव निलंगेकर, आ.रमेशअप्‍पा कराड यांच्‍याकडून,आ. सुजितसिंह ठाकूर आणि परिवाराचे 
सांत्‍वन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांचे पिताश्री मानसिंह ठाकूर यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ.रमेशअप्‍पा कराड यांनी बुधवार रोजी परंडा येथील निवासस्‍थानी भेट देवून ठाकुर कुटूंबीयांचे सांत्‍वन केले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांचे पिताश्री मानसिंह ठाकूर हे गेल्‍या कांही दिवसापासून आजारी असल्‍याने पुणे येथील खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत होते. दि.२६ ऑक्‍टोबर मंगळवार रोजी त्‍यांचे ह्रदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍याने दुःखद निधन झाले. आज २७ ऑक्‍टोबर बुधवार रोजी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिपचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे, माजी जिल्‍हाध्‍यक्ष शैलेश लाहोटी, जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे, ओबीसी आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष बापुराव राठोड, बाजार समितीचे विक्रम शिंदे, अमोल पाटील यांच्‍यासह अनेकांनी परंडा जि. उस्‍मानाबाद येथील निवासस्‍थानी भेट देवून ठाकूर कुटूंबीयांचे सांत्‍वन केले. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर व त्‍यांचे मोठे बंधु सुहास‍सिंह ठाकूर, नगरसेवक सुबोधसिंह ठाकूर व इतर अनेकजण होते.
 
Top