Views


*स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यांमध्ये विविध गुन्हे उघडकीस अनून तीन आरोपींना अटक* 


उस्मानाबाद/प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी कार्यवाही करत नळदुर्ग, तुळजापूर,लोहारा, पोलिस ठाण्यात दाखल असलेले 7 गुन्ह्यात असलेले तीन आरोपींना अटक करून धाडसी कार्यवाही केली.
 दिनांक 27/10/2021 रोजी ताब्यात असलेला आरोपी सुरज दिपक शिंदे रा.हंगरगापाटी ता.तुळजापुर याच्याकडे गुन्हे अनुषंगाने तपास करून त्याने व इतर साथीदार यांनी मिळून पोस्टे नळदुर्ग, तुळजापूर,लोहारा हददीत एकूण 07 गुन्हे केल्याची कबुली दिल्या वरून गून्हयातील मुद्देमाल जप्त करून एकूण 07 गुन्हे उघडकीस आणले
 यामध्ये सूरज दीपक शिंदे वय- 19 वर्षे रा. हांगरगा पाटी ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद विजय बापू काळे रा.हांगरगा पाटी ता. तुळजापूर अनिल पवार रा. सोलापूर यांच्या कडून 91 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किं 2,31,195/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदर कार्यवाही उ स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवार,
पोउपनि माने,पोना.हुसेन सय्यद,पोना . अमोल चव्हाण,पोकॉ.बबन जाधवर, पोकॉ.योगेश कोळी, 
पोकाॅ.अविनाश मरलापल्ले, पोकॉ.रवी आरसेवाड,
चा.पोकॉ.आनंद गोरे, यांनी केली


 
Top