Views


*राजेंद्र पाटील मित्र मंडळा तर्फे श्री क्षेत्र तुळजापूर पायी चालत जाणारे भाविकांना साठी अन्नछत्र*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त श्री क्षेत्र तुळजापूर येथे पायी चालत जाणाऱ्या भाविकांना साठी राजेंद्र पाटील मित्र मंडळा तर्फे अन्नदान देण्यात आले. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा उमरगा तालुका अध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधवजी पवार यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी भाजपा नेते टाचले सर, दिलीपजी गौतम, पं.स सदस्य वामनराव डावरे, सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, काशीनाथ घोडके, राजेंद्र पाटील मित्र मंडळाचे आप्पाराव पाटील, व्यंकटेश कागे, दादा वडगावे, महेश मानाळे, प्रसन्न एंकुडे, भिमाशंकर थाटे, शंकर पुरी, संतोष बिराजदार, संतोष जत्ती, दीपक कागे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top