Views



*लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, भाजपा लोहारा तालुका यांची विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस व विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा ना प्रवीण दरेकर यांच्याकडे भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस व विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा ना प्रवीण दरेकर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पिकपाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी बेंबळी येथे लोहारा तालुका भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील एकोंडी लो, राजेगाव, रेबेचिंचोली, सास्तुर या शिवारातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नदीपात्राची खोलीकरण व सरळीकरण करून इतर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, नदीकाठच्या शेतातील वाहून गेलेल्या मातीच्या नुकसानीचे शेतकऱ्यांना मोबदला मिळवुन देण्यात यावा. या शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन व सोयाबीन व ऊस या पिकात अक्षरशः पाणी थांबुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी राज्य सरकारला पाठपुरावा करुन ओला दुष्काळ जाहीर करुन घ्यावा व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी,अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, पं.स.सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, एससी मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, आदि, उपस्थित होते.
 
Top