Views


*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब येथे विधी सेवाविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन...*


कळंब/प्रतिनिधी

 दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) अंतर्गत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कळंब या ठिकाणी विधी सेवाविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ प्रविण यादव यांनी करून विधी सेवा समितीमार्फत आयोजित शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेणेबाबत आवाहन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर महेश ठोंबरे यांनी विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सेवांबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्याचप्रमाणे विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धतीचा कसा अवलंब करता येईल, विधी सेवा मिळविण्यासाठी कोण पात्र आहे याबाबतची सविस्तर माहिती शिबीरास उपस्थित असलेल्या नागरिकांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष मंदार मुळीक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सदरील कार्यक्रमासाठी सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब महेश कुडते, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश राेहिणी कुलकर्णी मॅडम, न्यायालयीन कर्मचारी इरफान मुल्ला, सुनील परदेशी, विष्णू डोके, सावनकुमार धामनगे, संतोष भांडे तसेच विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष विशाल दुगाने, जेष्ठ विधीज्ञ त्र्यंबक मनगिरे, श्रीहरी लोमटे, दत्ता पवार, वैभव कवडे, अभय पाटील, बंडू कोळपे, पांडूरंग नलावडे, इतर विधीज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top