Views







*येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज सातव्या माळे निमित्त देवीच्या तांदळ्यावर बखड्या लिंबाच्या पत्री पणाने साखळीची पूजा*


 कळंब/प्रतिनिधी

 तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज सातव्या माळे निमित्त देवीच्या तांदळ्यावर बखड्या लिंबाच्या पत्री पणाने साखळीची पूजा करण्यात आली होती.आज मंगळावर निमित्त दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती.आज भाविकांची गर्दी वाढल्याने भाविकांना उपवासा निमित्त मंदिर रस्त्यावर ठीक ठिकाणी शाबुखिचडीचे वाटप करण्यात आले.
येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचे मंदिर म्हणजे प्राचीन मंदिर आहे.या मंदिराच्या स्थापनेची कोणतीही कोनशीला अथवा शिलाण्यास मंदिर परिसरात उपलब्ध नाही.हे मंदिर दगडी शिळाने हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे.यावरुन मंदिराची प्राचीनता लक्षात येते. मंदिराच्या स्थापने विषय पुरातत्त्व खात्याने कोणतेही संशोधन आज पर्यंत केले नाही.मंदिराबाबत कुठलीही साधी नोंदही पुरातत्व खात्याकडे नसल्यानेच मंदिराचा म्हणावा तसा विकास झाला नाही असे जाणकार सांगतात.मंदिर स्थापने बाबत वेववेगले मत प्रवाह असले तरी मंदिराचा परिसर दुर्गम असताना मंदिराकडे जाण्यासाठी केवळ पायवाट होती. निजामशाहीच्या पूर्वीच्या काळात मंदिराची व देवीची सेवा भ्रम्हचारी शिवराम साधू यांनी व त्यांचा एक विश्वासु कुत्रा यांनी केल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरात या दोघांच्या समाधी स्थळ आहेत.
श्री येडेश्वरी मंदिर येरमाळा गावाच्या पूर्वोदक्षिण दिशेस बालघटच्या डोंगर रांगेत एक चारशे फूट उंचीच्या डोंगरावर आहे.मंदिराचे बांधकाम दगडी मोठमोठ्या शिळाने करण्यात आले होते. मंदिराच्या मागच्या बाजूस पूर्वी चिरेबंदी वाडेही होते.या ठिकाणी देवीच्या मंदिराची निर्मिती करणारे अथवा पुजारी येथे राहत असावे. हे वाडेही अशाच दगडी शिळांचे होते.
मंदिर स्थापने बाबत प्रभुरामाच्या काळात परशुरामाने मंदिर बांधले,तर निजमशाहीतील गावचे शिलेदार यांचे कुलदैवत माहुरगड येथील रेणुका मातेच्या मंदिराची प्रतिकृती म्हणून आबाजी पाटील यांनी बांधले,या बाबत वेगवेगळे मतप्रवाह आणि आख्यायिका सांगितल्या जातात.मंदिर स्थापने विषयी आज पर्यंत कोणतेही संशोधन झाले नाही.यामंदिर परिसरात साधूंच्या गुफाही होत्या या बाबतही सांगितले जाते.मंदिराला पूर्वी दगडी पायऱ्या होत्या सध्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून एकूण २०४ पायऱ्या सिमेंट काँक्रीटच्या बांधण्यात आल्या आहेत.
श्री येडेश्वरी देवीचे मंदिराचा परिसर पूर्वी अत्यंत दुर्गम होता.येण्या जाण्यासाठी केवळ एक पायवाट होती. त्या निजामशाहीच्या पूर्वीचा काळ म्हणून सांगितले जाते या काळात येडेश्वरी देवीची पूजाअर्चा सेवा शिवराम बुवा साधु करत असत असे येथील जेष्ठ पुजारी मंडळी सांगत.या बुवांना लागणाऱ्या विविध साहित्याची ने आन करण्यासाठी एक कुत्रा होता तो अत्यंत हुशार व समजदार होता.तो रात्री शिवराम बुवांचे व मंदिराची राखणही चोख बजावत असे आमचे पूर्वज सांगत असे असे पूजारी अरुण गुरव यांनी बोलतना सांगितले शिवराम बुवा यांच्या हयातीत त्यांचा सारथी व रक्षक मानल्या जाणाऱ्या कुत्र्याचा मृत्यू झाला त्यांनी त्याची आठवण म्हणून समाधीही मंदिरात बांधली आहे.ती आपण पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केल्यावर महादेव मंदिरासमोर आपल्या उजव्याबाजूस कुत्रासमाधी दिसते.कालांतराने शिवराम बुवासाधूनचाही मृत्यु झाला. त्यांची समाधी मंदिराच्या परिसरात मतंगी देवीच्या समोरील बाजूस पूर्वीच्या देवीच्या निर्माल्य कुंडाजवळ आहे.

 मंदिराच्या मागच्या बाजूस देवी तुळजाभवानीचे ठाण दीपमाळ आहे.पूर्वेला थोरली बहीण तर पश्चिमेला धाकटी बहीन येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.तर देवीच्या पाठी माझ्याशी लग्नकर म्हणून लागलेल्या भैरवनाथाचे मंदिर,मातंगी मंदिर म्हणजे जागृत मंदिर मानले जाते.या समोर बसून भाविक गुरुंनी दिलेल्या मंत्राची सिद्धी करतात.याशिवाय परिसरात जनाई,नरसिंह, गणपती,महादेव,आशा देवांची मंदिरं देवीच्या गाभाऱ्या भोवतीच्या परिसरात आहेत.

मंदिर रस्त्यावर सुखासागर हॉटेल जवळ नवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांना नवरात्रीच्या उपवासा निमित्त सुरेश साहेबराव बारकुल,बाप्पा माने मिस्त्री, नितीन जाधवर,सूर्यकांत बारकुल,संजय गायकवाड यांनी गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर भाविकांना फराळाच्या शाबुखीचडीचे वाटप केले जात आहे.


 
Top