Views


*लोहारा तालुका भाजपाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. व तसेच लोहारा तालुक्यातील दस्तापूर ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोहारा शहरात भाजपाच्या वतीने प्रतिमेचे पूजन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व दस्तापुर ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन पंचायत समिती सदस्य वामनराव डावरे व उपसरपंच सोमनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दस्तापूर तलाठी कार्यालयाकडून महात्मा गांधी जयंती निमित्त मोफत सातबारा वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य वामनराव डावरे यांच्या हस्ते मोफत सातबारा वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, मल्लिनाथ फावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, कल्याण ढगे, उमा स्वामी, लक्ष्मण माने, पं.स. सदस्य वामन डावरे, तलाठी पंढरगिरी, ग्रामसेवक इंगळे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र डावरे, कोतवाल धोंडिराम गडदे, यांच्यासह दस्तापुर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top