कळंब/प्रतिनिधी
तालुक्यात दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री. एम. डी. ठोंबरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब यांनी दिली. सदर कार्यक्रमाची सुरुवात ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवाणी न्यायालय स्तर कळंब येथून रॅलीचे आयोजन करून करण्यात आली. या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) मध्ये विधी सेवा विषयक शिबीर, शासनाच्या विविध योजना, कायदेविषयक बाबींची माहिती दिली जाणार असल्याची माहिती देऊन या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. एम. डी. ठोंबरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब यांनी केले आहे