Views*लिंगायत महासंघ तालुकाध्यक्ष पदी शंकर जट्टे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिराजदार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


 लिंगायत महासंघ महाराष्ट्र राज्य लोहारा तालुकाध्यक्षपदी शंकर जट्टे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिराजदार तर सचिवपदी जालिंदर कोकणे यांची निवड करण्यात आली. लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदीरात लिंगायत महासंघाची बैठक दि.९ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालिंदर कोकणे होते तर प्रमुख म्हणून लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांची होते. या बैठकीत लिंगायत समाजाला आरक्षण,गावं तिथे लिंगायत स्मशानभूमी, अनुभव मंटप यासह विविध विषयांवर चर्चा झाली. याबाबत समाजच्या इतर अडचणी बद्दल एकत्र येऊन प्रश्न मार्गी लावू असे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांनी सांगितले. या बैठकीत तालुका कार्याध्यक्ष पदी बसवराज बिडवे, संघटक पदी सागर पाटील, प्रसिद्धी प्रमुख पदी गणेश खबोले यांची निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या हस्ते सर्व निर्वाचित सदस्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समनव्य समिती माजी तालुका अध्यक्ष नागन्ना वकील, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जट्टे, जिल्हा संघटक बालाजी मेणकुदळे, पंचय्या स्वामी,दयानंद स्वामी, चिदानंद जट्टे, राजकुमार कोरळे, उमाकांत मठपती, हरी लोखंडे, शिवमूर्ती मुळे, अमित बोराळे, ओम कोरे, सचिन स्वामी, आदी उपस्थित होते.
 
Top