Views


*शिराढोण पोलिसाची धाडसी कार्यवाही*

कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील शिराढोण येथून दिनांक १८ एप्रिल २०२१ रोजी हिरो कंपनी ची मोटारसायकल क्रमांक २५ यु ३८४२ ही चोरी झाल्याची तक्रार गाडी मालक यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.या अनुषंगाने शिराढोण पोलिसांनी चक्र फिरवत तापास करून खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिराढोण पोलिसांनी आरोपी शहाबाज इस्माईल शेख रा.शिराढोण ता. कळंब यास ताब्यात घेतले.
सदर ची कार्यवाही कळंब पोलिस उपअधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नेटके, पोलिस उपनिरीक्षक गोडसे, पोलिस हेकाॅनस्टेबल गवळी, पोलिस नाईक शौकत पठाण, पोलिस कर्मचारी तारळकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.या कार्यवाही मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.धाडसी कार्यवाही ने शिराढोण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top