Views








*शिराढोण पोलिसांच्या कार्याला सलाम.*
*पुरामध्ये अडकलेल्या १८ जणांचे वाचवले प्राण*


कळंब/प्रतिनिधी

गेल्या चार पाच दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता.यामध्ये कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धनेगाव डाॅम ओवरफ्लो झाल्याने मांजरा नदीला महापूर आला उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलिस पथक यांनी अत्यंत महत्त्वाची जोखीम घेऊन जे कार्य केले
 यामध्ये शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट आमदार शौकत पठाण, सूनिल ताराळकर, दयानंद गादेकर, अनिल तांबडे ,कदम राम कनाने शाम आलापूरे व पोलीस ठाण्याचे कर्मचारी ने टीम बनून उस्मानाबाद येथील आपत्ती व्यवस्थापन पथक मधील कर्मचारी यांच्या मदतीने पुरात आडकलेले सुमारे १८ जणांचे जिव वाचवले हा भयानक अनुभव घेत नागरिकांनी शिराढोण पोलिसांना देव रूपी बघितले. शिराढोण पोलिस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 
Top