Views
*पोलीस अधीक्षक मा. श्रीमती नीवा जैन यांचे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्लाउस्मानाबाद शहरातील मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित नागरीकांच्यावतीने वतीने दि. 30 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक मा.श्रीमंती नीवा जैन यांची भेट घेऊन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव तथा जमियत उलेमा ए महाराष्ट्राचे मराठवाडा सरचिटणीस मसूद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, नगरसेवक बाबा मुजावर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आयाज शेख ( बबलु ) , नगरसेवक ईस्माल शेख, प्रदेश अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचे सचिव इलियास पिरजादे, समाजसेवक बिलाल तांबोळी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष समीयोदीन मशायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, उपस्थित होते.
 
Top