Views




*आ.ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा तालुक्यातील अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दि.30 सप्टेंबर 2021 रोजी उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, कवठा, मातोळा व लोहारा तालुक्यातील एकोंडी लो, राजेगाव, रेबेचिंचोली, सास्तुर या शिवारातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतात जाऊन विचार पूस करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, तहसीलदार संतोष रूईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग, जिल्हा परिषद सदस्य संतोष घंटे, कृषी पर्यवेक्षक डी.एम.जाधव, लातूर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता के आर येनगे, योगेश तपसाळे, शरद पवार, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख संदीप चौगुले, गोपाळ जाधव, नारंगवाडी येथील शेतकरी संजय पवार, भीमाशंकर माळी, नारंगवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर भोसले, अंबादास भोसले, कवठा येथील विलास पाटील, नितीन पाटील, अॅड. व्यंकट सोनवणे, व्यंकट मडोळे, एकोंडी लो येथील सूर्यवंशी, दत्ता जाधव, मनोज कुलकर्णी, विश्वास पाटील, मधुकर लाळे, हरी भोसले, राजेगाव येथील बालेपीर शेख, अविनाश देशमुख, अभिमन्यू देशमुख, सरपंच सुरेश देशमुख, ग्रामसेवक एस. ए.मोरे, यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, उपस्थित होते. तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नदीपात्राची खोलीकरण व सरळीकरण करून इतर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिले. शेतकऱ्यांना पीक विम्याची माहिती ऑनलाईन करण्यासाठी ग्रामपंचायत संगणक परीचालकांनी सहकार्य करावे, नदीकाठच्या शेतातील वाहून गेलेल्या मातीच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करावेत, निम्न तेरणा प्रकल्पाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी यांच्यात प्रकल्पातील पाणीसाठा बाबत समन्वय राहावा, यासाठी तात्काळ बैठक आयोजित करावी. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असलेल्या शेतकऱ्याकडून ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात यावे, असे निर्देश आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
Top