Views


*महाआवास अभियानात लोहारा पंचायत समिती व धानुरी ग्रामपंचायत औरंगाबाद विभागात दुसरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने दि.२० नोव्हेंबर २०२० ते ५ जुन २०२१ या कालावधीत घेण्यात आलेल्या महाआवास अभियानात पंचायत समिती लोहारा यांनी राज्यस्तरीय आवास योजनेत औरंगाबाद विभागात द्वितीय व लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत स्तरावरील द्वितीय पुरस्कार पटकावला असुन दि.३ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे मा.विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, पंचायत समिती लोहारा सभापती हेमलताताई रणखांब, गटविकास अधिकारी सोपान अकेले, जिल्हास्तरीय प्रोग्रामर मेघराज पवार, तालुकास्तरीय डीईओ प्रविण शेटे, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, ग्रामविकास अधिकारी प्रदिप जाधव, यांच्यासह ग्रामपंचायत धानुरीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
 
Top