Views


*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उमरगा तालुक्यातील नागरिकांची दारिद्र्य रेषेखालील नाव नोंदणी करून नव्याने राशन कार्डचीं फोड करून शिधापत्रिका वाटप करण्यात यावी -- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उमरगा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उमरगा तालुक्यातील नागरिकांची दारिद्र्य रेषेखालील नाव नोंदणी करून नव्याने राशन कार्डचीं फोड करून शिधापत्रिका वाटप करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उमरगा यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात अनेक अद्योग धंदे बंद पडले आहेत. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबंला उपास मारीची वेळ आली आहे. अनेक कुटुंबंला केशरी शिधा पत्रिका आहे त्यांची दारिद्र्य रेषेखाली नोंद असून त्याना राशन मिळेनासे झाले आहे.1998 सालच्या दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षण यादी नसून 2006 च्या सर्वेक्षण यादीत आहे असे तहसील कार्यालय, तलाठी, वं राशन दुकानदार यांचे म्हणणे आहे. केशरी कार्ड धारकांना बिपीएल कार्ड धारकांना राशन मिळते वं एपीएल कार्ड धारकांना रेशन मिळत नाही म्हणून तहसील कार्यालयाने नव्याने दारिद्र रेषेखालील नाव नोंदणी वं पंतप्रधानानी दिलेल्या सर्व सुविधाचा लाभ मिळवून द्यावा व जनतेची हेळसांड थांबवावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास दादा शिंदे, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुलोचना वेदपाठक, बालाजी जमादार, मल्लिकार्जुन साखरे, राजू मणियार, जयवंत कुळकर्णी कल्पना कलशेट्टी, उमादेवी कलशेट्टी, परविनं नंदाफ, मनीषा हराळे, पल्लवी औरादे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
 
Top