Views
*परंडा पोलिसांनी बहीण भाऊवातील जमीनीचे वाद सामंजस्य पणे सोडवून वाद मिटविला*

*परंडा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक जिज्ञासा पायाळे यांच्या कर्तव्या ची सर्वत्र कौतुक*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

शेताच्या एका काकरी साठी सख्खा भाऊ पक्का वैरी होतो. शेत जमीन साठी कुटूंबातील भाऊ भाऊ वाद करतात तर कधी भाऊ बहिण मध्ये जमीन ला घेऊन वाद होत. वाद कधी कधी खूप विकोपाला जाऊन हाणामारी होते. तर एकमेकांचे खून करण्या पर्यंत वाद जातो. तर काही वाद कोर्टात जाऊन पिडीनां पीडी वर्षानुवर्षे वाद कोर्टात चालू राहत.

      असच एक वाद परंडा तालुक्यातील ब्रह्मगाव येथील भाऊ बहिण मध्ये जमीन वरून वाद निर्माण झाला. ब्रम्हगाव येथील जमीन वरून बहीण मंगल नागनाथ कदम रा.तांदुळवाडी ता.माढा जि.सोलापूर आणि भाऊ बाबासाहेब मारूती जाधव रा. ब्रम्हगाव ता.परंडा जि.उस्मानाबाद यांच्या मध्ये जमीनीवरून वाद निर्माण झाला
         
           मंगल कदम रा. तांदुळवाडी ता.माढा यांनी ब्रम्हगाव ता. परंडा येथील जमीन गट नंबर ४७ मधील ४० आर जमीन २०१५ साली खरेदी केली होती.

     मंगल कदम या तांदुळवाडी ता.माढा येथे राहत आहे. मगंल कदम यांचे भाऊ बाबासाहेब मारूती जाधव रा. ब्रम्हगाव ता.परंडा जि.उस्मानाबाद यांनी बहीणीच्या जमीनी वर कब्जा करून वहीवाट करत व बहीणीला जमीनी मध्ये येण्यासाठी मजाव करून गेल्या वर्षापासून वाद करून बहीणीला जमीनी मध्ये येण्यासाठी वाद करत हा वाद परंडा पोलिस ठाण्यात जाऊन ठेपला वाद वर्षभर चालू होता.
     
      हा वाद परंडा पोलिस ठाण्याचे लोणी महिला पोलिस बीट अंमलदार जिज्ञासा पायाळे यांनी पुढाकार घेऊन परंडा पोलिस निरीक्षक गिड्डेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी शुक्रवारी (दि.१७) दोघा भाऊ बहीणीला एकत्र घेऊन बसून सम उपदेश करून भाऊ बहीणचे वाद मिटविला व जमीन ही बहीणीच्या ताब्यात लोणीचे महिला बीट अंमलदार जिज्ञासा पायाळे यांनी शेता मध्ये उभा राहुन जमीनीचे कब्जा दिला. 

       हा वाद विकोपाला जाऊन कोणत्याही स्तरावर जाऊ शकत होता. परंतु महिला पोलिस बीट अंमलदार जिज्ञासा पायाळे यांनी सर्तकता दाखवत प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुढाकार घेत वाद मिटवुन परत एकदा आपल्या कामाचे कर्तव्य दक्षता दाखविली महिला पोलिस बीट अंमलदार जिज्ञासा पायाळे यांच्या कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.
कुटूंबातील दिवाणी दावा दाखल करता दहा वीस वर्ष त्यातच घालवण्यापेक्षा दोन्ही एकत्र येऊन त्यात मार्ग नक्कीच निघतो


        जिज्ञासा पायाळे
महीला पोलिस नाईक बीट अंमलदार   
Top