Views


*भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर पुन्हा एकदा समाजकारणात सक्रिय*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

गेल्या दीड वर्षापासून कोरोना व इतर आजाराशी झुंज देत पुनर्जन्म प्राप्त केलेले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जवळपास 15 महिन्याच्या प्रदीर्घ आजारपणातील विश्रांतीनंतर आज पुन्हा समाजकारणात एंट्री केली.
आमदार सुजितसिंह ठाकूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव असे आमदार आहेत त्यांना राजकारणातील 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव हा ग्राउंड लेव्हलचा आहे. एक पत्रकार ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व राज्यातील एक प्रमुख नेते म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. त्यांना गतवर्षी मे मध्ये कोरोना झाला होता त्यानंतर त्यांना इतरही काही आजारांनी ग्रासले होते.त्यानंतर प्रदीर्घ विश्रांती घेत त्या आजारावर मात केली व आज ते उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ते व सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होते. यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ठ विभागाचे राज्य संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी,भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक प्रवीण पाठक, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपाच्या महिला नेत्या अर्चनाताई अंबुरे यांच्यासह अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आजारपणाच्या काळातही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते, भाजपा व इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी देखील संपर्क ठेवला होता. मात्र भाजपाची राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात जो भाजपा पक्षात जोश होता तो काहीसा कमी झाला होता. त्यातही भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदार संघात तर भाजपाला प्रमुख नेता वाली उरला नव्हता.चांगले सैन्य असून देखील सेनापती विना हे सैन्य सैरावैरा झाले होते आता मात्र त्यांच्या रियन्ट्री मुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.


 
Top