*भूम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांची ACB औरंगाबाद परिक्षेत्र येथे बदली*
भूम/प्रतिनिधी
महाराष्ट्रात भूम येथील एक तालुका, एक पोलिस स्टेशन,एक गणपती अशी एक अभूतपूर्व संकल्पना प्रत्यक्षात उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी आणली. सर्व गणेश मंडळ ,सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पोलीस प्रशासन, तसेच पोलिस निरीक्षक दत्तात्रेय सुरवसे , पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे यांना ही संकल्पना सांगून त्यांनी एक महाराष्ट्रासमोर आदर्श घडवला आहे.
भूम उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांची ACB औरंगाबाद परिक्षेत्र येथे बदली झाल्याने, भूम उपविभाग येथुन कर्तव्य मुक्त झाले,ते सर्वसामान्य एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणुन कृष्ण- सुदाम्या सारखं मैत्रीचं नातं निभावलं आहे.त्यांना यावेळी विविध सामाजिक संघटना,पत्रकार बंधू , भुम पोलिस अधिकारी यांनी या भावना व्यक्त केल्या.
यावेळी न. प. गटनेते. माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,नगरसेवक किरण जाधव ,सागर टकले,संदिप मोटे,धनंजय मस्कर,सुनील थोरात, युवा उद्योजक सुरज गाढवे,संजय साबळे, बाळासाहेब अंधारे,हर्षल डिसले, अड अमर ढगे,दत्ता नलवडे,दत्ता गाढवे ,वस्ताद मामु जमादार, अमोल भोसले,मुशीर भाई शेख,विष्णू शिंदे, पत्रकार अब्बास सय्यद, हरीश गाढवे,राकेश जाधव, अजय माळी,लालु पवार, बिरजेश पौळ, तसेच नागरीक, पोलीस अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार बांधव यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.