Views*विकास दूत प्रकल्प जिल्हा समन्वयक ऊस्मानाबाद राबवणार सामाजिक उपक्रम एक आठवण आपल्यादारी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

  त्रिशरन एन्लाईटमेंट फाउंडेशन पुणे विकास दुत प्रकल्पाच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्हा विकास दुत प्रकल्प समनवयक शाहिदा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली 100 विकास दुत्तांच्या माध्यमातून राबवला जाणार सामाजिक उपक्रम एक आठवण आपल्या दारी. हा उपक्रम संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे यांच्या संकलपनेतून, विकास दुत प्रकल्प संचालक दिगंबर वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येत आहे.गाव वस्ती, तांडा शहर इत्यादी ठिकाणी जाऊन विकास दुत कोरोना काळात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना मानसिक व भावनिक धीर देऊन एक छोटेसे रोपटे त्यांच्या दारी लावून त्यांची आठवण जपण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 358 तालुक्यान मध्ये विकास दूत प्रल्कपच्या मध्यमातुन 6500 विकास दूत एकआठवन आपल्या दारी हा सामाजिक उपक्रम राबवत आहेत, अशी माहिती जिल्हा विकास दुत प्रकल्प समनवयक शाहिदा सय्यद यांनी दिली.
 
Top