Views


*उमरगा-लोहारा तालुक्यातुन प्रहार सदस्य नोंदनिला युवकांचा अधिक प्रतिसाद, एकाच दिवसात दिडशे युवकांनी प्रहार मध्ये मारली उडी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा शासकीय विश्राम ग्रहात रविवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात उमरगा लोहारा तालुक्यातील जवळपास दीडशे युवकांनी सदस्यत्वाचे फॉर्म भरून प्रहार जनशक्ती पक्षात सामील होत, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्याला साथ देऊन सामाजिक कार्यात व चळवळीत सामील होण्याचा निश्चय केला यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी राचय्या स्वामी हे होते. सदस्य नोंदणीच्या या कार्यक्रमात प्रहार सैनिक सुरज आबाचने यांची उमरगा लोहारा संपूर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. यावेळी प्रहार चे तुळजापूर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे,येनेगुर चे अभिजित खजुरे,तुळजापूर शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उमरगा टाईम्स चे संपादक माहेबूब पठाण यांचा सत्कार करत त्यांच्या पत्रकारितेबाबत कौतुक प्रहार चे जिल्हाध्यक्ष श्री देशमुख यांनी केले. सर्व सदस्य आता प्रहार सैनिक असून राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या कार्याला साजेल असे सामाजिक बांधिलकी जोपासत आपापल्या भागात, गावात अन्यायाच्या विरोधात ठाम भुकीका मांडून वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न प्रहारच्या माध्यमातून करावे असे श्री देशमुख यांनी कार्यक्रमात मार्गदर्शनपर भाषण करताना युवकांना संबोधित केले. जिथे अन्याय तिथे प्रहार असा नारा देत सर्वांनी बच्चू कडू यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बसवराज मसरे,नामदेव ढगे,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जेवळे, दिलीप जगताप,इसाक शेख,दिनेश किर्मीडे, किसन पवार,महेश सोनवणे, मयूर कटके आदींसह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top