Views



  *राज्य पुरस्कृतआवास योजनेत पंचायत समीती लोहारा जिल्हात प्रथम*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

ग्रामविकास विभाग मार्फत घेन्यात आलेल्या राज्याततील महाआवास आभीयानात पंचायत समिती लोहारा जिल्ह्यामध्ये प्रथम आली असून हे अभियान 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद तथा जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते पंचायत समिती लोहाराच्या सभापती सौ.हेमलता रणखांब व गटविकास अधिकारी सोपान अकेले व सह गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, 
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक अनिल कुमार नेवाळे, मेघराज पवार जिल्हास्तरीय प्रोग्रॅमर तालुकास्तरीय प्रवीण विविध प्रमुख लोकप्रतिनिधी अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते. पंचायत समिती लोहारा जिल्हा मध्ये प्रथम आल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव पंचायत समिती लोहारा यांच्यावर होत आहे.
 
Top