Views*जिल्हा भाजपा कार्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

स्वातंत्र्य दिन हा भारतीयांचा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी संपुर्ण देश भरात मोठया उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश सुमारे १५० वर्षाच्या ब्रीटीश गुलामगिरीतुन मुक्त झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला होता. तेव्हांपासुन दर वर्षी १५ ऑगस्टला हा राष्ट्रीय उत्सव भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणुन साजरा केला जातो. दर वर्षी प्रमाणे या वर्षीही प्रतिष्ठाण भवन जिल्हा भाजपा कार्यालयात ध्वजारोहन करुन ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. हे ध्वजारोहन तुळजापुर-उस्मानाबाद विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन, तसेच जेष्ठ भाजपा नेते सुरेश देशमुख यांच्या हस्ते ‍तिरंगा ध्वजारोहन करण्यात आले, ध्वजारोहना नंतर सामुहीक राष्ट्रगीत म्हणन्यात आले. या ध्वजारोहनास प्र.का.स. ॲड.खंडेराव चौरे, प्र.का.स. ॲड.अनिल काळे, प्र.का.स.सतिष दंडनाईक, नेताजी पाटील, ॲड.नितीन भोसले, प्रदिप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, राजकुमार पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, अनंत देशमुख, संजय लोखंडे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, अभय इंगळे, युवराज नळे, दाजीप्पा पवार, चंद्रजित जाधव, शिवाजी पंडगुडवाले, सुजित साळुंके, नामदेव नायकल, आषीश नायकल, ओम नाईकवाडी, प्रितम मुंडे, सुरज शेरकर, तसेच धाराशिव शहर व ग्रामीण भागातील युवा मोर्चा व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.
 
Top